Shanidev Upay : शनि दोष कसा दूर करायचा? शनिवारच्या दिवशी करा 'हे' पाच उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shanidev Upay

Shanidev Upay : शनि दोष कसा दूर करायचा? शनिवारच्या दिवशी करा 'हे' पाच उपाय

शनिवार हा शनिदेवाचा खास दिवस असतो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केल्या जाते. शनिदेवाची आराधना, पुजा केली जाते. काही राशींवर शनिदेवाची कृपा तर काही राशींवर शनिदेवाची नाराजी असते. ज्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो.

जर राशी किंवा जीवनात शनि दोष असेल तर तो कसा दूर करायचा, याविषयी शास्त्रात काही उपाय सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया हे उपाय कोणते? (Shanidev Upay do these remedies on shaniwar Shani curse will away )

1. शनिवारच्या दिवशी ॐ शं शनैश्चराय नमः असा जप करावा. यामुळे शनिदेवाची कृपा आपल्या जीवनावर राहील आणि आपल्याला शनिदोषपासून मुक्तता मिळणार.

2. शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि साखरेचा नैवद्य करावा. यामुळे शनिदोष दूर होणार

3. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली पाणी अर्पण करावे. शनिदेवाची पूजा करावी आणि हनूमानाचीसुद्धा पूजा करावी.

हेही वाचा: Ravan Shani Dev Katha : रावणामुळे शनिदेवाची साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते; जाणून घ्या कथा

4. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी शनिदेवाला नीले फूल अर्पण करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि शनिदेवाचा दोष दूर होतील.

5. शनिवारच्या दिवशी काळे कपडे, लोखंडाचे भांडे, काळे तीळ, ब्लँकेट, उडीद दाळ दान करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता

टॅग्स :worshipworship services