

Sharadiya Navratri 2025 date
Sakal
शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे?
या नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
Shardiya Navratri 2025 Dates and Ghatsthapana Muhurat: हिंदू पंचागानुसार शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. हिंदू धर्मात हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो आणि दरवर्षी देशभर मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
उत्तर भारत आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये जसे की उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगालमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. नऊ दिवस भाविक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. या दरम्यान भाविक पूर्ण विधींनी उपवास करतात आणि माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. यंदा वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊया.