Shivling : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यात नेमका फरक काय?

ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असून ते स्वत: प्रकट झालेले आहेत
shivling
shivling esakal

पुणे : तुम्ही सर्वांनी ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग याविषयी ऐकले असेल. सोमवारी शिवलिंगाला दूध, पाणी, फळे, फुले इत्यादी अर्पण केले जातात. ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने पुण्य लाभते,अशी अनेकांची भावना आहे. पण, अनेकांना असे वाटते की ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग दोन्ही एकच आहेत, पण तसे नाही. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. दिसायला एकसारखे असले तरीही हे दोघे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत ते जाणून घेऊया.

शिवपुराणातील कथेनुसार, एकदा ब्रम्हा आणि विष्णू ही या गोष्टीवर वाद करत होते की. आपल्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. बराचवेळ यावर त्यांची चर्चा सुरू होती. चर्चेचे वादात रुपांतर झाले. त्यावर या दोघांची चर्चा संपवण्यासाठी भगवान शंकर महान ज्योतीस्तंभाच्या स्वरूपात प्रकट झाले. या ज्योतीचा दाह इतका होता की, ब्रह्मा आणि विष्णू सहन करू शकले नाहीत. त्यांना त्यांची चूक लक्षात आली. याच ज्योती पृथ्वीवर १२ ठिकाणी प्रकट झाल्या. यालाच १२ ज्योतिर्लिंग म्हटले जाते.

नेमका फरक काय?

लिंगाचा अर्थ आहे प्रतीक. म्हणजेच शंकराचे ज्योती रूपाने प्रकट होणे आणि सृष्टीचा निर्माण करणे होय. ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असून ते स्वत: प्रकट झालेले आहेत. तर, शिवलिंग हे मनुष्याकडून स्थापन केलेले आणि स्वयंभू अशा दोन्ही रुपात असू शकतात.हिंदू धर्म ग्रंथांमध्ये भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख असल्याचे दिसून येते. जिथे-जिथे ही शिव ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. तिथे आज भव्य शिव मंदिर बनलेली आहेत.

ही आहेत १२ ज्योतिर्लिंग

जिथे ज्योतिर्लिंग प्रकट झाले तिथे भगवान शंकरांची मंदिरे आहेत. सोमेश्वर, श्रीशैलम मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ महादेव, नागेश्वर महादेव, रामेश्वरम आणि घुष्मेश्वर अशी १२ ज्योतिर्लिंगांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com