Shravan 2022 : रिसोड येथील श्री सिद्धेश्वर संस्थान

श्रावण विशेष : रिसोड शहराच्या पश्चिमेस सिद्धेश्वर महादेवाचे हेंबाडपंथी मंदिर आहे
Shravan 2022 Risod Sri Siddheshwar mahadev temple
Shravan 2022 Risod Sri Siddheshwar mahadev temple

रिसोड : शहराच्या पश्चिमेस सिद्धेश्वर महादेवाचे हेंबाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर व श्रावण महिन्यातही भक्तांची मोठी रिघ असते. याच मंदिरात श्री संत अमरदास बाबा वास्तव्यास होते. त्याही पूर्वी या ठिकाणी अनेक ऋषीमुनी राहत असल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच या गावचे नाव पूर्वी ऋषीवट होते. सिद्धेश्वर संस्थान अतिप्राचीन संस्था आहे. हेंबाडपंथी मंदिर असून पूर्वेस अतिशय निसर्गरम्य व नदी तीरावर बांधलेले हे मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. आजही मंदिराच्या जवळ असलेले वटवृक्ष याची साक्ष देत अखेरच्या घटीका मोजत उभे आहेत. पूर्वी या घनदाट जंगलात हिंस्र पशु राहत असत अमरदास बाबांचे वास्तव्य ही याच मंदिरात होते.

रात्रीच्या वेळी बाबांच्या आजूबाजूला हिंस्रपाशी व साप वावरत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. रात्री अंधार पडल्यानंतर या परिसरात कोणीही फिरकत नसेल तसेच बाबाही रात्री कोणाला येण्यास सक्त मनाई करत होते. अमरदास बाबांनी याच मंदिराच्या बाजूला १९४५ साली समाधी घेतली. या सिद्धेश्वर मंदिराचा जिरणोद्वार करून त्या ठिकाणी बाजूलाच अमरदास बाबांचे भव्य मंदिर व सभा मंडप बांधण्यात आला असून दररोज या ठिकाणी अन्नदान चालते. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केल्या जातो.

तसेच या ठिकाणी श्रावण महिन्यातही भक्तांची मोठी वर्दळ असते. मार्च महिन्यात या ठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. नुकतेच या ठिकाणी अजंता फार्मा मुंबई यांच्या वतीने भव्य प्रवेश द्वार व बगीच्या बांधण्यात आला असून मंदिराचा परिसर शिवशोभीत करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com