Shravan 2022 : आस्था व श्रद्धेचे दैवत सिंदखेडचा ‘श्री मोरेश्वर’

श्रावणात भाविकांची राहते गर्दी; गावाला येते यात्रेचे स्वरूप
Shravan 2022 Sindkhed Shri Moreshwar mahadev temple
Shravan 2022 Sindkhed Shri Moreshwar mahadev temple

बार्शीटाकळी : तालुक्यातील दक्षिणेतून उत्तरेत वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या काठावर बसलेल्या सिंदखेडवासीयांचे आराध्य दैवत असलेल ‘श्री मोरेश्वर महादेवा’चे अतिप्रचिन स्वयंभू मंदिर आहे. मंदिरातील सभा मंडपात शिवलिंगाकडे तोंड करून पाषाण कलाकृतीने सुशोभित नंदी बसलेले आहेत, तर समोरच चार ते पाय फूट खोल असलेल्या गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीला चांदीच्या पत्राचे आवारण लावलेले आहे. असंख्य महादेवाचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी श्रावणात दर्शनासाठी पंचक्रोषातिल भाविकांची मोठी वर्दळ पाहवयास मिळते.

येथील सामाजिक कार्यकर्ते राजदीप वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदखेड मोरेश्‍वर येथील रहिवाशी स्व. निंबाजी वाघ हे शनी शिंगणापूरची पायी वारी करत होते, असा त्यांचा नियम बराच वर्षांपर्यंत चालला. काही काळानंतर त्यांचे वय वाढल्याने त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले की, आता तुला पायी वारीला न येता तुझ्याच गावात मी तुला दर्शन देणार आहे, त्यामुळे तू येथून परत जा, तुझ्या गावात मातीचा मोठा ढीग खोद आणि मी तुला दर्शन देतो, असे म्हणून अलौकीक शक्ती नाहीशी झाली.

घडलेल्या स्वप्नाची संपूर्ण हकीकत वाघ यांनी ग्रामस्थांना सांगितली. त्यानुसार ग्रामस्थांच्या सहकार्याने मातीचा मोठा ढीग खोदत असताना, त्या ठिकाणी महादेवाची मोठी पिंड आणि नंदीची मूर्ती आढळून आली, त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्या जागेवर मोठे महादेवाचे मंदिर उभारण्यात आले. तेंव्हापासून चैत्र शु. अष्ठमीला देवाचे लग्न व चैत्र शु. १२ ला महादेवाची यात्रा भरवण्याला सुरुवात झाली.

श्रावणात विदर्भातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावतात. औरंगजेबाच्या काळात बाबर आणि महम्मद घोरी हे मंदिरच्या ठिकाणी आले. ते मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले असता, त्यांना दिसेनासे झाले. हे फक्त त्यांच्या पुरते झाले नाही, तर त्यांच्या सोबत असणाऱ्यांनाही तसेच झाले. चिड आल्यामुळे त्यांनी मंदिर उद्‍ध्वस्त करण्याचे ठरविले. परंतु, सर्व ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. हे मंदिर साक्षात्कारी असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. परंतु, ग्रामस्थांचे म्हणणे त्यांना मान्य झाले नाही, त्यामुळे आम्ही या देवाला जे साकडे घालू आणि ते जर तसेच घडले, तर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करून मंदिर न पाडता येथून निघूण जाऊ. मंदिर पाडण्यासाठी आलेल्या दोघांकडून मंदिरातील नंदीला साकडे घातले की, तू जर साक्षात्कारी असणार, तर ही गवताची पेंडी खासील आणि सकाळी शेण देशील, असे म्हणून गवताची पेंडी नंदीसमोर ठेवण्यात आली आणि संपूर्ण मंदिर त्यांनी त्याब्यात घेतले व शिपाई पहाऱ्यावर ठेवले.

सकाळी साक्षात्कार घडला आणि त्या दोघांनी नंदीला घातलेले साकड्या प्रमाणेच घडले, त्यामुळे हे मंदिर साक्षात्कारी असल्याचे त्यांना मान्य केले आणि आपले इतर कोणतेही सैनिक मंदिर उद्‍ध्वस्त करणार नाहीत म्हणून त्यांनी निशाणी म्हणून मंदिरावर मिनार उभारले.

महान संताचीही मंदिराला भेट

सिंदखेड मोरेश्‍वर येथे सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. चैत्र अष्ठमी ते चैत्र १२ या पाच दिवसाच्या उत्सवामध्ये गावातील लेकीबाई सहभागी होतात. येथील महादेवाच्या मंदिराला तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा मिळाला आहे. मंदिराच्या आवारात निंबाजी महाराज वाघ यांची समाधी आहे. या ठिकाणी श्री संत गजानन महाराज, तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, गुलाब बाबा येऊन गेले आहेत. त्यामुळे या मंदिराचा मोठा इतिहास असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com