
थोडक्यात
श्रावणातील उपवासामुळे पचनसंस्था सुलभ राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आयुर्वेदानुसार उपवास नैसर्गिक डिटॉक्सचा भाग आहे, जो मानसिक स्पष्टता आणि ऊर्जाही वाढवतो.
Shravan Month 2025 Fasting Benefits: श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पाणी रस्त्यावरून वाहत जलसाठ्यांमध्ये मिसळते. रस्त्यावरील घाणही सोबत असते. त्यामुळे जलसाठे दूषित होतात. परिणामी, अनेक आजार बळावतात. पोटाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. श्रावणात उपवास केल्याने रोजच्यापेक्षा या महिन्यात पचनशक्ती सुधारते, पालेभाज्यांचा समावेश केला जात नाही. श्रावणात उपवास करण्याचे काय फायदे आहेत, कांदे, लसूण, वांगी या भाज्या वर्ज्य केल्या जातात.