
Traditional women’s games in maharashtra festivals: पिंगा ग पोरी पिंगा हे गाणे ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामुळे नव्या पिढीला माहिती झाले असले तरी मराठीतील हे खूप पारंपरिक गाणे आहे. ते मंगळागौरीच्या खेळांच्या वेळी गायले जाते. सध्या श्रावण सुरू असून दर मंगळवारी नव्या नवरी मंगळागौरीची पूजा करतात. त्यानिमित्ताने मंगळागौरीचे खेळ रंगत असून पिंगा ग पोरी पिंगा, नाच गं घुमा आदी गाणी ऐकायला मिळत आहेत.
मंगळागौरीला रात्र जागवत विविध खेळ खेळण्याची पूर्वी पद्धत होती. कालौघात हे खेळ मागे पडले होते, मात्र पुन्हा एकदा मंगळागौरीच्या खेळांची पद्धत सुरू झाली असून नागपुरातील अनेक महिला मंडळांना आमंत्रित करून हे खेळ खेळले जात आहेत.