
Cultural heritage of Shri Kshetra Devbardi: श्रीक्षेत्र देवबर्डी (मोहपा) येथील आश्रमात देवपूजेस पविते अर्पण करण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची मांदियाळी उपस्थित होणार आहे. महानुभाव पंथात पविते पर्व काळास महत्त्व असून पविते पर्वाला राखी पौर्णिमेपासून प्रारंभ होणार आहे.
श्रावण शुद्ध चतुर्दशीला प्रारंभ होणारा सण श्रावण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. ओले नारळ, सुपाऱ्या, सुताचा धागा, फुले, फळ, नागवेलीचे पाने, सडा समार्जन, सुरेख रांगोळी, फुलवात, चंदन गंध, वस्त्रदान, अन्नदान, ज्ञानदान साहित्य घेऊन परमपवित्र देवपूजेस तीर्थस्थानास त्यानंतर श्री गुरू तपस्वी साधुसंत साध्वी यांच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने हे पर्व साजरे केले जाते.