
परिवर्तिनी एकादशीला भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर वळतात, म्हणून या दिवशी तुळशीपूजन आणि दीपदानाचे विशेष महत्त्व आहे.
३ सप्टेंबरला साजरी होणारी ही एकादशी जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
तुळशीची पूजा आणि दान केल्याने भक्ती वाढते आणि पापांचा नाश होतो.
Parivartini Ekadashi: धार्मिक श्रद्धेनुसार परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर वळतात. म्हणूनच याला परिवर्तिनी म्हणतात. या दिवशी उपवास, तुळशी पूजा आणि दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. यंदा ३ सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशी साजरी केली जात आहे. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील समस्या आणि अडचणी दूर होतात.