

Ujjain Gopal Mandir History How Marathas Recovered Somnath Silver Doors From Lahore and Brought Them to Ujjain
esakal
महाकालाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी द्वारकाधीश गोपाल मंदिर हे मराठा स्थापत्यकला, धार्मिक श्रद्धा आणि इतिहासाच्या अनेक रंजक आठवणी जपणारे महत्त्वाचे मंदिर आहे.
या मंदिराशी संबंधित सर्वांत चर्चेत असलेली बाब म्हणजे गर्भगृहातील चांदीचे दरवाजे. सोमनाथपासून सुरू झालेला या दरवाजांचा प्रवास गझनी, लाहोर असा होत अखेर उज्जैनमध्ये पोहोचल्याची प्रचलित ऐतिहासिक कथा सांगितली जाते.