
महाकुंभ नगरी : प्रयागराज येथील विविध घाटांवरून नियमितपणे तपासले जाणारे पाण्याचे नमुने, भाविकांनी संगमावर अर्पण केलेली फुले आणि अन्य पूजासाहित्य सातत्याने वेचून नदीचे पाणी स्वच्छ करणारी यंत्रणा आणि महाकुंभ नगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा या वैशिष्ट्यांसह कुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावरील स्नान हे जसे पवित्रतेची अनुभूती देणारे आहे, तसेच स्वच्छतेची अनुभूती देणारेही ठरेल याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.