Sri Family Guide : आयुर्वेदाची ओळख - जीवनाचे शास्त्र

आयुर्वेद ही संज्ञा आयु: (जीवन) आणि वेद (विद्या) या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाली आहे आणि तिचा अर्थ ‘जीवनाचे शास्त्र’ असा होतो.
Ayurveda
Ayurvedasakal

- स्टेफनी फाईट, चीफ क्युरेटर श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम

आयुर्वेद ही संज्ञा आयु: (जीवन) आणि वेद (विद्या) या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाली आहे आणि तिचा अर्थ ‘जीवनाचे शास्त्र’ असा होतो. आयुर्वेदाचा आधार प्राचीन भारतीय परंपरा आहे आणि ते मन, शरीर व आत्मा यांच्या संतुलनावर लक्ष केंद्रित करून आरोग्य आणि हित याविषयी एक समग्र दृष्टिकोन देते. सुमारे ५००० वर्षांहून प्राचीन अशी ही पद्धती सध्याच्या जलद युगात अतिशय उपयुक्त ठरेल असे शाश्‍वत ज्ञान देते.

आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान

आपले पर्यावरण, शरीर, मन आणि आत्मा यांचे गतिशील संतुलन म्हणजे आरोग्य, हा विचार आयुर्वेदाचा गाभा आहे. रोग म्हणजे केवळ शारीरिक व्याधी नव्हे तर या सर्व परस्परसंलग्न क्षेत्रांमधील विसंवादाचे प्रकटीकरण आहे, असे आयुर्वेद मानते. या व्यापक भूमिकेत आहार, जीवनशैली, विषारी घटक काढून टाकणे, व्यायाम, निद्रा आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समावेश होतो. ‘चरकसंहिता’ आणि ‘सुश्रुतसंहिता’ या ख्रिस्तपूर्व काळाच्या सुरूवातीच्या शतकांतील शाश्‍वत ग्रंथांमध्ये आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान सामावलेले आहे.

पंचमहाभूते

मानवी शरीरासहीत विश्‍वातील प्रत्येक गोष्ट पाच मूलभूत तत्त्वांपासून निर्माण झाली आहे, ही आयुर्वेदाची मूळ कल्पना आहे. पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नी), वायू (हवा) आणि आकाश (अंतरिक्ष) ही तत्त्वे एकत्र येऊन वात, पित्त व कफ हे त्रिदोष तयार होतात. त्रिदोष म्हणजे शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रमुख ऊर्जा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com