दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील ‘सुंदर स्वप्न’

शांतपणे तेवणाऱ्या दीपमालिकेच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील एक सुंदर स्वप्न.
दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील ‘सुंदर स्वप्न’
Updated on

शांतपणे तेवणाऱ्या दीपमालिकेच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील एक सुंदर स्वप्न. अशा या दीपमालिकेकडे पाहिल्यावर असे वाटते की, ‘दीपांच्या तेजोमय नयनांनी वसुंधरा आसमंतातील चंद्र चांदण्यांकडे डोळे मिचकावून पाहत प्रसन्नतेने हसत तर नाही ना? तेजपुंज सूर्य देवतेच्या चंदनी रथाखाली असंख्य तारांगणाचा चुरा होऊन त्यांच्या चमचमणाऱ्या तेजस्वी कणांची उधळण पृथ्वीतलावर या दीपमालिकेच्या रूपाने केली नसेल ना’...

हे दीप मालिके तुझ्या त्याच्यात मोतियाचा रंग आहे.

‘श्याम सुंदराचा शृंगार आहे.

इंद्रधनुच्या सप्तरंगाचा अल्लाद आहे.

तुझ्या अंगात वर्षा ऋतूची चपलता आहे.

शरद ऋतूची मनमोहकता आहे.

तुझ्या सुखात सहवासाने मानवी मने आनंदात.. अंतरंगातील चंदेरी स्मृती उजळून जातात.

हे दीप मालिके तुझ्याकडे पाहिल्यावर असंही वाटून जातं...

जला वीना मिने कसे.

सुरा वीना सूर मंदिर कसे.. दीपमालीके वीना दीपोत्सव कसे’...

बरेच दिवस आपण आतुरतेने वाट पाहणारी दीपावली येते ही सुखद कल्पना साकारू लागतात. सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान.. आकर्षक कपड्यांची लयलूट.. सुगंधी अत्तरानी स्प्रेनी साजशृंगाराला आलेला बहर... पंचपक्वान्नांच्या मेजवानीचा मनसोक्त भोजन तृप्त झालेल्या मनास विश्रांती... सुखाचा मनमुरादपणे घेण्यात येणारा उपभोग.. हास्य-विनोद यांच्या मैफिलीत गप्पांना आलेली वाढती रंगत... दीपावली अंकाचे केलेले वाचन… विविध खेळ, वाद्य, गायन गीत, संगीत, साऱ्यांचा मनमुरादपणे घेतलेला आनंद... फटाक्यांची आतषबाजी..एक ना दोन अशा कितीतरी अनमोल क्षणांच्या आनंदानी... मानवी मनात भारावून टाकणारी ही आनंदाची दिवाळी... म्हणूनच दीपोत्सवात माणूस स्वतःला हरवून जातो. विसरून जातो. हे बाकी खरं.

दसऱ्याची सांगता होते नी दिवाळीची हळुवार चाहूल लागते. हिरवागार शालू नेसून वसुंधरा ही या दिवाळीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली असते. पिवळ्याधमक झेंडूची फुले.. अंगणात पडलेल्या प्राजक्ताचा सडा... हिरव्यागार पानातून डोकावणारी शेवंतीची फुलं.. जळून जणू दिवाळी येणार म्हणून आनंदानं वाऱ्यावरच डोलत असतात...

आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया पर्यंतचे पाच दिवस हे दिवाळी म्हणून साजरी करण्यात येणारी परंपरा आपल्याकडे आहे. साधारणतः एक हजार वर्षांपासून दिवाळी हा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झालेली असावी, असा उल्लेख आपल्या पुराणांमधून ग्रंथांमधून आढळतो. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. त्या दिवशी सुवासिनी संपूर्ण दिवस आपल्या मुलाबाळांसाठी उपवास करतात.

भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी गाय- बैल हा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे.

दिवाळीचा दुसरा दिवस आश्विन वद्य त्रयोदशी यालाच धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. या मानाच्या धुताना त्यादिवशी दीपदान करण्याची पद्धत हिंदू संस्कृतीमध्ये आहे. धनत्रयोदशीला अभ्यंग स्नान करून दिवे लावले जातात. वर्षातील केवळ याच दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेकडे ठेवण्याची पद्धत आहे. कारण, या दिवसाच्या प्रकाश हा यमासाठीच असतो. असे मानले जाते की, दिव्याचे तोंड दक्षिणेकडे ठेवले तर अशुभ समजले जाते. आयुर्वेदाचे उपासक वैद्य यांच्या मतानुसार धनत्रयोदशी हा दिवस १४ रत्नामपैकी धन्वंतरी या आयुर्वेदाची गंगोत्री असणाऱ्या तिची जन्मतिथी म्हणून तिची यथासांग पूजा करून धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीला स्त्री मंडळीचे स्नान तर नरकचतुर्दशीला पुरुष मंडळीचे स्नान करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या नंतरचा दिवस म्हणजे आश्विन वद्य चतुर्थीचा दिवस. हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशीची आख्यायिका अशी आहे.

पृथ्वीपासून ज्याचा जन्म झाला तो राक्षस म्हणजे नरकासूर. नरकसूर खूप उन्मत्त झालेला होता. त्याने वरणाचे छत्र चोरले. अमोल रत्नभांडार यांची लयलूट केली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. त्यानंतर सर्वांगसुंदर अशा देखण्या सोळा सहस्र १०८ स्त्रियांना बंधमुक्त केले. तो दिवस पुढे नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जाऊ लागला. या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आपणाकडे सुरू झाली. नरक चतुर्दशी नंतरचा दिवस आश्विन कृष्ण अमावास्येला म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. नरकचतुर्दशी प्रमाणे पहाटे लवकर उठून स्नान करून घरातील देवतांचे पूजन केले जाते. त्यानंतर वडीलधारी मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.

लक्ष्मीपूजनाची सुरवात खऱ्या अर्थाने सायंकाळी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची विधीवत पद्धतीने पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आजही पाळली जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. पाडव्याला घराघरांतून सरस्वती देवतेचे पूजन केले जाते. व्यापारीवर्ग वही पूजन करतात. पाडव्याची सर्वांना परिचित आहे. विष्णूचा पाचवा अवतार बटूचा वेश परिधान करून त्यावर मिळवलेल्या विजय साकार करण्याचा हा दिवस म्हणजे पाडवा.

कार्तिक शुद्ध द्वितीयाचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवसाला भावा-बहिणीच नातं जपण्याचा हा दिवस असे संबोधले जाते. उत्सवाचा राजा म्हणजेच दीपोत्सव. आबालवृद्धांना गोरगरिबांना सुखद आठवणीची आनंदाची.. सुखद क्षणांची.. समाधानाची.. शिदोरी देणारा उत्सव म्हणजे दीपोत्सव. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक जण दिवाळीचा हा सण विलक्षण आनंदाने उत्साहाने साजरा करीत असतो.. सुखावून जातो एक वेगळ्याच आशेने जीवन फुलवीत असतो, अशावेळी ओढ लागते ती पुढील वर्षी येऊ पाहणाऱ्या त्या आनंद देणाऱ्या.. विलक्षण सुख... समाधान..आनंद देणाऱ्या दीपोत्सवाची..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com