

Surya Nakshatra Prediction 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य वेळोवेळी केवळ राशीच बदलत नाही तर नक्षत्र देखील बदलतो. या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. सध्या सूर्य मीन राशीच्या शेवटच्या नक्षत्र रेवतीमध्ये स्थित आहे. परंतु 14 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीच्या पहिल्या नक्षत्र अश्विनीमध्ये प्रवेश करेल. हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण अश्विनी नक्षत्र नवीन सुरुवात, आरोग्य आणि उर्जेचे प्रतीक मानलं जातं. या नक्षत्राचा स्वामी केतू आहे आणि तो मेष राशीत येतो, जिथे सूर्याचे स्थान उच्च आहे. याचा अर्थ सूर्य आपल्या पूर्ण शक्तीने या नक्षत्रावर प्रभाव पाडतो. हा बदल कोणत्या राशींसाठी फायदेशीर असणार आहे हे जाणून घेऊया.