Surya Grahan 2022 : दिवाळी नंतर लागणार सूर्य ग्रहण, ‘या’ राशींनी घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surya Grahan 2022

Surya Grahan 2022 : दिवाळी नंतर लागणार सूर्य ग्रहण, ‘या’ राशींनी घ्या काळजी

या वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण २५ ऑक्टोबरला लागणार आहे. हे सूर्यग्रहण २ वाजून २८ मिनिटांनी असणार आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरला दोन्ही दिवस अमावस्येची तिथी राहणार आहे. तर २५ ऑक्टोबर मंगळवारी सूर्य ग्रहण असणार आहे. हे ग्रहण २०२२ मधील आंशिक सूर्य ग्रहण असून वर्षातील दुसरे ग्रहण असणार आहे.  

या ग्रहणात सुतकही वैध असेल आणि त्याचे नियमही पाळावे लागतील. दिवाळीच्या रात्री 2.30 च्या सुमारास ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. मेष, मिथुन, कन्या, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर या ग्रहणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सर्व राशींवर कसा परिणाम करेल हे जाणून घेऊया.

मेष - वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. व्यापार-उद्योगात विशेष काळजी घ्या. श्री विष्णूची पूजा करा, पिवळ्या वस्तूंचे दान करा.

वृषभ - करिअर आणि पैशामध्ये यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. महादेवाची पूजा करावी. गुळाचे दान करावे.

कर्क - यावेळी करिअर आणि निवासस्थानात बदल होऊ शकतो. माता आणि स्त्री पक्षाला त्रास होण्याची चिन्हे आहेत. महादेवाची पूजा करा, पांढर्‍या वस्तू दान करा.

मिथुन - मुलांशी संबंधित समस्या येऊ शकतात. आरोग्याची विशेषत: पोट आणि मधुमेहाची काळजी घ्या. श्रीकृष्णाची पूजा करावी. काळ्या वस्तू दान करा.

सिंह - आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारेल. अडथळे दूर होतील, यश मिळेल. सूर्य मंत्राचा जप करा, काळ्या वस्तू दान करा.

कन्या - आर्थिक आणि कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन जपून चालवा. इजा टाळा. महादेवाची पूजा करा, अन्नदान करा.

तूळ – कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांचा त्रास होऊ शकतो. अपघात होणे, शस्त्रक्रिया होणे अशी परिस्थिती येऊ शकते. श्रीरामाची पूजा करा, लाल फळांचे दान करा.

वृश्चिक - करिअरमध्ये अडथळे आणि प्रतिकूल बदल होऊ शकतात. यावेळी नातेसंबंध सांभाळा. महादेवाची पूजा करा, अन्नदान करा.

धनु - करिअर आणि जीवनात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शत्रू आणि विरोधक पराभूत होतील, ज्येष्ठांची काळजी घ्या. श्री विष्णूची पूजा करा, पिवळ्या फळांचे दान करा

मकर - करिअरमध्ये मोठ्या यशाचा आणि बदलाचा काळ आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. हनुमानाची पूजा करा. तांब्याचे भांडे दान करा.

कुंभ - आरोग्याची काळजी घ्या विशेषतः मधुमेह आणि पोटाशी संबंधित विकार. पैशाच्या खर्चामुळे अडचणी वाढू शकतात. श्रीकृष्णाची पूजा करावी. कपडे दान करा.

मीन - वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. अपघात आणि वादापासून सावध रहा. श्री विष्णूची पूजा करावी. अन्न आणि पाणी दान करा.

टॅग्स :Diwali