
Surya Grahan 2025: ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण घटना खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. ही एक खगोलीय घटना आहे. त्याचे शुभ-अशुभ परिणाम सामान्य जनतेवरही होतात. हिंदू धर्मात ग्रहण काळ हा शुभ काळ मानला जात नाही. या काळात धार्मिक आणि शुभ कार्य टाळले जातात. तसेच ग्रहणाच्या काळात काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. त्याच वेळी, चंद्रग्रहणाची खगोलीय घटना तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीच्या मध्ये आल्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रावर पडत नाही. यंदा पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी लागणार आहे आणि सुतकाची वेळ काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया.