मराठी वर्षातील श्रावण हा पवित्र महिना मानला जातो. कारण या महिन्यात व्रतवैकल्ये जास्त असतात. तसाच, मराठी वर्षातला दुसरा महत्त्वाचा महिना हा मार्गशिर्ष आहे. कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी देवी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. तर या महिन्यात चंपाषष्ठी व्रतही केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा ९ डिसेंबर रोजी शनिवारी चंपाषष्ठी आहे. या दिवसाचे पौराणिक महत्त्व जाणून घेऊयात.