esakal | दिनविशेष - ०१ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं? History
sakal

बोलून बातमी शोधा

दिनविशेष - ०१ ऑक्टोबर, इतिहासात  आजच्या दिवशी काय घडलं?

पंचांग : १ ऑक्टोबर २०२१, शुक्रवार : भाद्रपद कृष्ण १०, दशमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ९ शके १९४३.

दिनविशेष - ०१ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंचांग : १ ऑक्टोबर २०२१, शुक्रवार : भाद्रपद कृष्ण १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री २.१७, चंद्रास्त दुपारी २.५८, दशमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ९ शके १९४३.

दिनविशेष - 1 ऑक्‍टोबर
ज्येष्ठ नागरिक दिन । जागतिक रक्तदान दिन
1854 - भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. त्यात पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात व्हिक्‍टोरिया राणीचे चित्र छापले होते.
1887 - समाजसेवक व उदारमतवादी विचारवंत हृदयनाथ कुंझरू यांचा जन्म. 1927 ते 1930 च्या दरम्यान ते मध्यवर्ती कायदेमंडळाचे सदस्य, तर 1952 ते 1962 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. शिक्षण, रेल्वे, संरक्षण व परराष्ट्रीय धोरण इ. क्षेत्रांत त्यांनी विशेष कर्तबगारी दाखविली.
1905 - लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा जन्म. "कळ्यांचे निःश्वास' हे पुस्तक त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लिहिले.

1919 - विख्यात कवी व पटकथा-संवाद-लेखक गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म. त्यांनी दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठी आणि 15 हिंदी चित्रपटांसाठी काम केले. त्यांचा जोगिया हा कवितासंग्रह, चार संगीतिका व गीतरामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र या काव्यकथा प्रसिद्ध आहेत. तसेच कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती हे कथासंग्रह, आकाशाची फळे ही कादंबरी, मंतरलेले दिवस व वाटेवरल्या सावल्या ही आत्मचरित्रपर पुस्तके उल्लेखनीय आहेत. त्यांच्या गीतरामायणाने कीर्तीचा कळस गाठला.
1931 - मराठीतील नाट्यछटा या वाङ्‌मयप्रकाराचे जनक "दिवाकर' यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे. 51 नाट्यछटांचा संग्रह हे त्यांचे मुख्य वाङ्‌मय होत. "पंत मेले, राव चढले', "काटलेला पतंग', "वर्डस्वर्थचे फुलपाखरू' इ. त्यांच्या नाट्यछटा उल्लेखनीय आहेत.
1995 - नामवंत उद्योगपती, फिरोदिया उद्योगसमूहातील कंपन्यांचे अध्यक्ष व मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष हस्तिमल कुंदनमल फिरोदिया यांचे निधन.
1995 - प्रसिद्ध उद्योगपती व बिर्ला उद्योगसमूहाचे प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन.
1995 - प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आर. के. नय्यर यांचे निधन.

1996 - मद्रास शहराचे नामांतर करून "चेन्नई' असे नामकरण करण्यात आले.
1996 - "श्रीलंकेचे गांधी' म्हणून ओळखले जाणारे श्रीलंकेतील ज्येष्ठ समाजसेवक आणि गांधीवादी नेते डॉ. ए. टी.आर्यरत्ने यांना "गांधी शांतता पुरस्कार' जाहीर. यापूर्वी त्यांना मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, जपानमधील निवानो शांतता पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत.
1996 - प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. शांताराम भालचंद्र देव यांचे निधन.
2001 - जम्मू-काश्‍मीर विधानसभेच्या श्रीनगर येथील इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अतिरेक्‍यांच्या आत्मघातकी पथकाने घडवून आणलेल्या कारबॉंबच्या स्फोटात 30 जण मृत्युमुखी.
2003 - भारतातर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या गांधी शांतता पारितोषिकासाठी 2003 या वर्षासाठी चेक प्रजासत्ताकाचे माजी अध्यक्ष व्हॅक्‍लेव्ह हॉवेल यांची निवड. एक कोटी रुपये व मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
2004 - भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकपदाची एअर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय यांनी सूत्रे स्वीकारली. हवाई दलातील त्रितारांकित दर्जाच्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
2004 - आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या रक्षणाची ठाम भूमिका घेणारे; तसेच निर्भीड व निःस्पृह अशी ख्याती असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विद्यारण्य दाजीसाहेब तुळजापूरकर यांचे निधन. ताठ कण्याचा आणि तत्त्वाशी तडजोड न करणारा रामशास्त्री बाण्याचा न्यायमूर्ती म्हणून त्यांचा लौकिक होता.

loading image
go to top