esakal | दिनविशेष - 12 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

dinvishes

दिनविशेष - 12 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग -

मंगळवार : आश्विन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दु. १२.२४, चंद्रास्त रा. ११.३५, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), सरस्वती पूजन, भारतीय सौर आश्विन २० शके १९४३.

दिनविशेष ता. १२ ऑक्टोबर

जागतिक संधिवात दिन

1850 - अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

1874 - फ्रान्सचे पंतप्रधान व प्रसिद्ध इतिहासकार प्येरुर गीयोम फ्रांस्वा गीझो यांचे निधन. त्यांनी साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांवर विपुल लेखन केले आहे.

1911 - विख्यात कसोटी क्रिकेटपटू, समाजसेवक, उद्योगपती व क्रिकेट समालोचक विजय मर्चंट यांचा जन्म. अंध, अपंग यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मोठे कार्य केलेले आहे.

1921 - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे, गोवा मुक्ती लढ्याचे एक झुंझार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू , विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ पत्रकार जयंतराव टिळक यांचा जन्म. राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता तसेच तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार आदी विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले.

1922 - शब्दांवर मनापासून प्रेम करणारी आणि आपल्या विविध भावभावनांचा आविष्कार अचूकपणे व्यक्त करणाऱ्या समर्थ कवयित्री, गीतकार आणि भोवतालचे अनुभव डोळसपणे शब्दबद्ध करणाऱ्या ललितलेखिका शांताबाई शेळके यांचा जन्म. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, अनुवाद, ललितलेखन, चित्रपटगीते, बालगीते, नाट्यगीते इ. विविध साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले.

1964 - एका अंतराळातून तीन प्रवासी पाठविण्याच्या पहिल्या प्रयत्नात रशियाला यश. त्यापाठोपाठ पाच प्रवासी असलेले अंतराळयान सोडण्यात आले. त्यामुळे एका वेळी दोन याने व आठ अंतराळप्रवासी असा विक्रम केला गेला.

1965 - स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हेरमान म्यूलर यांचे निधन. डीडीटी या रासायनिक पदार्थांच्या अनेक कीटकांवरील संपर्कजन्य विषारी परिणामांच्या शोधाबद्दल त्यांना 1948 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

1967 - नामवंत समाजवादी नेते, विचारवंत, लेखक, संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचे निधन. ते स्वतः इंग्रजीचे उत्तम जाणकार होते. मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. "अंग्रेजी हटाओ' ही चळवळ त्यांनी चालविली होती. लोकसभेतील प्रभावी वक्ते म्हणून ते ओळखले जात.

1998 - 33 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून "इंटरनॅशनल वूमन मास्टर' हा किताब मिळविला.

2000 - भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्‍सिकोच्या जैवरसायन शास्त्रज्ञ डॉ. इव्हॅंजेलिना विलेगास यांना प्रोटीनयुक्त मक्‍याची जात विकसित केल्याबद्दल "सहस्रक जागतिक अन्न पुरस्कार' जाहीर.

2000 - चार अयशस्वी प्रयत्नानंतर अमेरिकेच्या डिस्कव्हरी अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे अवकाशस्थानक तयार करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून हे उड्डाण करण्यात आले.

2001 - संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००६ - तुर्कस्तानचे साहित्यिक ओरहान पामुक यांना साहित्याचा ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर. ‘माय नेम इज रेड’ आणि ‘स्नो’ ही त्यांची पुस्तके प्रचंड गाजली.

२००७ - तपोवृद्ध ब्रिटिश कादंबरीकार डॉरीस लेसिंग यांना २००७ चा वाङमयीन क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. ‘गोल्डन नोटबुक’ ही त्यांची सर्वोत्तम कादंबरी.

२००८ - केरळमध्ये लहान वयात धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या सिस्टर अल्फोन्सा यांना रोमन कॅथॉलिक चर्चचे पहिले संतपद मरणोत्तर बहाल केले. ६२ वर्षांपूर्वी सिस्टर अल्फोन्सा यांचे निधन झाले, त्या वेळी त्या अवघ्या ३६ वर्षांच्या होत्या. असे संतपद मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे झालेल्या या शानदार समारंभात पोप बेनेडिक्‍ट (१६ वे) यांनी हे संतपद बहाल केले.

२०१५ - ब्रिटिश-अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ प्रा. अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर. उपभोग, गरिबी आणि विकास यावरील अभ्यासासाठी अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.

loading image
go to top