esakal | दिनविशेष - 8 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं? |History
sakal

बोलून बातमी शोधा

dinvishes

शुक्रवार, 8 ऑक्टोबर २०१९ : अश्विन शुद्ध २, मु. रबिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन १६ शके १९४३.

दिनविशेष - 8 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंचांग -

शुक्रवार : अश्विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सकाळी ८.०६, चंद्रास्त सायंकाळी ७.५५, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, मु. रबिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन १६ शके १९४३.

दिनविशेष - ८ ऑक्‍टोबर
भारतीय वायुसेना दिन
२००३ ः अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एंजल आणि ब्रिटनचे क्लाईव्ह ग्रेंजर यांना आर्थिक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.
२००४ ः केनियातील "ग्रीन बेल्ट मूव्हमेंट'च्या प्रणेत्या व पर्यावरण उपमंत्री वनगारी मथाई यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर. आफ्रिका खंडातील महिलेला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.
२००७ ः ‘जीन्स टार्गेटिंग’ या अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापर करून ‘शोभिवंत उंदरा’ची (डिझायनर माऊस) निर्मिती करणाऱ्या तीन संशोधकांना वैद्यकक्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.
२००९ ः रुमानियात जन्मलेल्या जर्मनीच्या हार्टा म्युलर यांना साहित्याचे नोबेल जाहीर.
२०१४ ः सूक्ष्मदर्शीमधून पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे सखोल स्वरूपात निरीक्षण करता येण्याची नवी पद्धत विकसित केल्याबद्दल अमेरिकेच्या एरिक बेटझिंग, विल्यम मॉर्नर आणि जर्मनीच्या स्टीफन हेल या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर.

loading image
go to top