

Navratri 2026: Why Goddess Tuljabhavani Rests on a Silver Bed Before Fighting Mahishasura
esakal
Tuljabhavani Manchaki Nidra 2026: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होत आहे. यंदा ११ ऑक्टोबर २०२६ ला घटस्थापना होणार असून, त्यापूर्वी ३ ते १० ऑक्टोबर या कालावधीत आई तुळजाभवानी देवी 'मंचकी निद्रेत' (Palanquin Rest) असणार आहे. या काळात तुळजापूर येथील मंदिरात भाविकांना देवीचे नेहमीप्रमाणे थेट चरणस्पर्श दर्शन घेता येत नाही.
जगात तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही एकमेव 'चलमूर्ती' (Movable Idol) आहे, जी वर्षातून तीन वेळेस पलंगावर विश्रांती घेते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अनोखी परंपरा का पाळली जाते आणि यामागील पौराणिक व धार्मिक महत्त्व काय आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.