Tulsi Vivah 2022 : तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulsi Vivah 2022

Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. संस्कारांची व्यवस्थित जाणीव व्हावी आणि तुळशीपासूनचे आरोग्याचे फायदेही मिळावेत, या हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे.

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी.

उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला (Dev uthani ekadashi) विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीनंतर लग्नासारख्या मोठ्या सेलिब्रेशनला, चांगल्या कामांना सुरुवात केली जाते. प्राचीन काळापासून तुळशी विवाहाच्या दिवशी  (Tulsi vivah) तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जातं. शाळीग्रामासोबत तुळशीचं लग्न लावण्याच्या प्रथेमागील कहाणीदेखील तितकीच खास आहेतुळशीचं लग्न शाळीग्रामासोबत का होतं ?

आख्यायिकेनुसार, जालंधर हा तुळशीचा पती होता. तो अत्यंत अत्याचारी होता. विष्णू देवाने तुळशीला,' तू माझ्या सेवेत असे पर्यत तुझ्या पतीला युद्धात कोणीच मारू शकत नाही. ' असे वरदान दिले होते. त्यामुळे जेव्हा जालंधर युद्धात जायचा तेव्हा तुळस विष्णूंच्या सेवेत असायची परिणामी जालंधर विजयी ठरायचा. मात्र असेच चालू राहिल्यास भविष्यात जालंधर संपूर्ण विश्वावर राज्य करेल आणि साऱ्या संसारात त्याच्या अत्याचाराचा हाहाकार पसरेल अशी भीती महादेव शंकरानी बोलून दाखवली.जालंधराला संपवण्यासाठी महादेवांनी विष्णूला जालंधराचं रूप घेऊन तुळशी समोर जाण्यास सांगितले. यामुळे तुळस विष्णूजींची पूजा करत नसल्याची वेळ साधत जालंधरावर हल्ला करण्यात आला.

तुळशीच्या समोर जालंधराचं मुंडकं आणि धड वेगवेगळ्या स्थितीत पडलेलं रूप पाहून तिला जबर धक्का बसला. विष्णू देवांनी माझ्या भावनांचा अनादर केल्याच्या रागाने तिने त्यांना रागाच्या भरातच दगड बनण्याचा शाप दिला.विष्णूला दगडाच्या स्वरूपात पाहून साऱ्या सृष्टीने तुळशीकडे शाप मागे घेण्याची मागणी केली. तुळशीनेही हा शाप मागे घेत जालंधरासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस तुळशी शिवाय प्रसादाचा स्वीकार न करण्याचा निर्णय विष्णू देवांनी जाहीर केला. म्हणुणच देव उठनीनंतर कार्तिक महिन्यात शाळीग्राम रूपातील विष्णू सोबत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशीचा आणि शाळीग्राम दगडाचा विवाह केल्याने कन्यादान केल्यासारखे पूर्ण मिळते अशी समजूत आहे. त्यामुळे दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरितादेखील तुळशीचं लग्न लावलं जातं

टॅग्स :cultureTulsiHistory