

Tulsi Ganesha Curse Hindu Mythological Story
sakal
Why Tulsi is Avoided in Ganesh Worship: प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर महाराष्ट्रात तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासातील योगनिद्रेतून जागृत होतात आणि शुभकार्यांची सुरुवात होते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाचे भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाशी म्हणजेच कृष्ण किंवा विष्णू यांच्याशी लग्न लावले जाते. त्यानंतर इतर शुभकार्य आणि विशेषतः लग्नाचे मुहूर्त सुरू होतात.