
Varaha Jayanti Pooja Vidhi: भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी वराह अवताराला खास स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला ही वराह जयंती साजरी केली जाते.
या दिवशी भक्त मनापासून भगवान विष्णूंची पूजा करून आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीची कामना करतात. ही जयंती फक्त धार्मिक विधींशी जोडलेली नसून, तिच्यामागे एक प्रेरणादायी कथा आहे जी आपल्याला आठवण करून देते की अन्याय आणि अधर्म कितीही बलवान असले तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो.