Vasant Panchami 2024 : सरस्वती पूजन कसे करावे? वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या.
Vasant Panchami 2024 : सरस्वती पूजन कसे करावे? वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

आज वसंत पंचमी आहे. हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेचा आहे. हिंदू कालदर्शिकेनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला वसंत पंचमी (Vasant Panchami) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत वसंत पंचमीला विशेष महत्त्व आहे. 

हा सण यंदा आणखी खास आहे कारण 200 वर्षांनंतर सरस्वतीची पूजा 6 महायोगांमध्ये होणार आहे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया सरस्वती पूजन कसे करावे आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर वसंत पंचमी साजरी करावी.

वसंत पंचमी 13 फेब्रुवारीला दुपारी 02 वाजून 41 मिनिटांला सुरू झाली असून 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजून 9 मिनिटांला समाप्त होणार आहे. त्यामुळे उदयातिथीनुसार सरस्वती पूजन 14 फेब्रुवारीला करू शकतात. सकाळी 7 ते दूपारी 12 वाजून 41 मिनिटांपर्यंत सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे सरस्वती पूजनासाठी केवळ साडे पाच तासांचा कालावधी मिळणार आहे.

असे करा सरस्वती पूजन...

वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वतीची पूजा करावी.

देव घराची स्वच्छता करावी.

पाटावर सरस्वती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

सरस्वतीला पिवळे वस्त्र परिधान करावे. तूपाचा दीपक लावावा.

पिवळी फुले, अक्षता आणि मिष्ठान्न देवीला अर्पण कराव्यात.

सरस्वती चालीसा पठण करावा.

पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. नैवेद्य द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com