

Vastu Shastra advice on what not to keep in the bedroom for positive energy, peace, prosperity, and harmonious relationships.
esakal
Vastu Shastra Advice : वास्तुशास्त्रानुसार बेडरूम ही केवळ झोपण्याची जागा नसून ती आपल्या जीवनात सुख, शांतीचे केंद्र असते. जर या खोलीत सकारात्मक ऊर्जा असेल, तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि पती-पत्नीमधील संबंध मधुर राहतात. परंतु अनेकदा आपण नकळत काही अशा वस्तू बेडरूममध्ये ठेवतो, ज्यामुळे घरातील ऊर्जेचा समतोल बिघडतो. यामुळे केवळ मानसिक शांतता भंग पावत नाही तर आर्थिक चणचण आणि प्रगतीत अडथळे येऊ लागतात. म्हणूनच सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममधून काही ठराविक वस्तू तातडीने बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असते.