

According to vastu shastra 5 Black items attracts Negative Energy
esakal
वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरात असलेल्या वस्तू केवळ सजावटीचे साधन नसून त्या ऊर्जेचा स्रोत असतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर सुख-समृद्धी नांदते परंतु नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला की विनाकारण कटकटी आणि आर्थिक चणचण भासू लागते. विशेषतः काळ्या रंगाच्या काही वस्तू घरामध्ये चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास अलक्ष्मीचा वास होतो, असे मानले जाते. यामुळे घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो कुटुंबात विनाकारण वादविवाद होतात आणि नोकरी-व्यवसायात प्रगती खुंटते. म्हणूनच वास्तूच्या नियमांनुसार कोणत्या ५ काळ्या वस्तू घरात ठेवणे टाळावे जाणून घ्या