Vastu Tips : काळा कुत्रा पाळणे चांगले की वाईट ? काय सांगते शास्त्र

हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते
vastu tips
vastu tips esakal
Updated on

पुणे : अनेकांच्या घरी पाळीव कुत्रे असून ते त्याची काळजी घेतात. पण, आजही समाजातील एक वर्ग पाळीव प्राण्यांच्या बाबतीत नकारात्मक असल्याचे दिसते. काही लोकांना कूत्रा पाळायचा असतो पण, त्याबद्दल येणाऱ्या अफवा ऐकूण लोक हा विचार सोडून देतात. अशा स्थितीत कुत्रा पाळण्याबाबत ज्योतिषशास्त्र आणि धर्म काय सांगतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार पाळीव कुत्रा फायद्याचा आणि नुकसानदायकही असू शकतो. हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते. यामुळेच पाहुयात कुत्रा पाळणे चांगले की वाईट.

शनि आणि केतू

ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो. काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनि आणि केतूचा प्रभाव असतो.त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा राहत नाही. त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते. कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास शनिसोबतच राहू-केतूच्या क्रोधापासून बचाव होतो, असे सांगितले जाते.

नशीब बदलणारा कुत्रा

जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतात. अशा लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात, असे शास्त्रात सांगितले जाते.

मुलांच्या आनंदासाठी

ज्योतिष शास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार, काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते. मुलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते.

भैरव देवतेचा सेवक

कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो. कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात. त्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा समज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com