Vastu Tips : दिवाळीत घराच्या प्रवेद्वाराच्या दिशेनुसार भरा रांगोळीत रंग, लक्ष्मीकृपा होईल

रांगोळीला शुभ प्रतिक मानलं गेलं आहे. दारात रांगोळी असली की घरात सकारात्मकता येते असं मानलं जातं.
Vastu Tips
Vastu Tips esakal

Diwali Rangoli According to Directions of Entrance : दिवाळीला घरोघरी आणि दारोदारी सुंदर, सुबक रांगोळ्या बघायला मिळतात. रांगोळीला शुभ प्रतिक मानलं गेलं आहे. दारात रांगोळी असली की घरात सकारात्मकता येते असं मानलं जातं.

वास्तूशास्त्राच्या दृष्टीने पण फार महत्व देण्यात आलं आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, की रांगोळीचे रंग आणि घराच्या प्रवेशद्वाराची दिशा यांचाही संबंध असतो. योग्य दिशेला योग्य रंग भरून रांगोळी काढली तर घरात सकारात्मकता, समृध्दी वाढते असं तज्ज्ञांचं मत आहे.

Vastu Tips
Vastu Tips For Yoga : योग अन् प्राणायाम करून फायदा होत नाहीये? ही दिशा ठरेल कारक

याविषयी सोशल मीडियावरील धार्मिक, वास्तू विषयक इन्फ्लूएंसर जाई मदान यांनी एक व्हीडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. वास्तूला अनुसरून रांगोळी काढली तर घरात समृध्दी सुख नांदते असं त्यात म्हटलं आहे.

Vastu Tips
Vastu Tips For Gifts : 'या' भेटवस्तुंमुळे घरात येते दारिद्र्य; चुकूनही करू नका स्वीकार

जाणून घेऊया दिशा आणि रांगोळीचा रंग

  • दारात रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा समृध्दीच्या रूपाने घरात येते.

  • रांगोळीत लक्ष्मीची लहान पावले अवश्य काढावी.

  • जर घराचं प्रवेशद्वार उत्तरेला आहे तर रांगोळीत नीळा रंग आणि तांदळाचा वापर करा.

Vastu Tips
Vastu Tips : पैशाच्या पाकीटात ठेवा ही एक वस्तू ; पैसा टिकेल आणि वाढेलही
  • जर प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर गोल्डन, पिवळा, केशरी अशा रंगाचा वापर करा.

  • जर दक्षिण पूर्वेला प्रवेशद्वार असेल तर लाल, हिरवे रंग वापरून रांगोळी काढा. दिव्यांचे आकार काढा.

  • जर पश्चिमेकडे दार आहे तर काळ्या, पांढऱ्याबरोबर चंदेरीसारखे चमकदार रंग वापरून रांगोळी काढा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com