Vastu Tips : घरातील 'या' दिशेला घड्याळ लावणं ठरू शकतं वाईट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Clock

Vastu Tips : घरातील 'या' दिशेला घड्याळ लावणं ठरू शकतं वाईट?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Vastu Tips: घर लहान असो किंवा मोठं.. प्रत्येक घरात कॅलेंडर आणि घड्याळ Clock या दोन वस्तू नक्कीच असतात. घराच्या भिंतीची शोभा वाढवण्यासाठी किंवा हौस म्हणून नानाविध डिझाइन्सचे घड्याळ घरात लावले जातात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, की वास्तूशास्त्रानुसार जर ते घड्याळ योग्य दिशेला लावलं नसेल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. घर किंवा ऑफिसमधील घड्याळाची दिशा हे आपलं कार्य, प्रगती, आजूबाजूचं वातावरण या गोष्टी प्रभावित करते. घरातील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घडाळ्याविषयी वास्तूशास्त्रात काही महत्त्वाच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ते जाणून घेऊयात..

कोणत्या दिशेला घड्याळ नसावे?

वास्तूशास्त्रानुसार, घर सजवताना घड्याळ्याच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये, असं सांगितलं जातं. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास, घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळे घरातील सदस्याचं मन शांत राहत नाही आणि सतत वादविवाद होऊ लागतात, असं म्हटलं जातं.

कोणत्या दिशेला घड्याळ असावे?

वास्तूशास्त्रानुसार उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावणं सर्वोत्तम मानलं जातं. या दिशांच्या भिंतींवर घड्याळ लावल्याने घरात सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. याशिवाय घरात सुख, समृद्धी यांची वृद्धी होते, असं सांगितलं जातं.

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या प्रवेशद्वारावर किंवा दारावर कधीही घड्याळ लावू नये. यामुळे घरात तणाव वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बंद घड्याळसुद्धा घरात ठेवू नये. घड्याळ बंद झालं असेल तर ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावं किंवा ते बदलून घ्यावं. वास्तूशास्त्रानुसार, बंद घड्याळ हे विकास आणि आनंदावर बाधा आणतात. घडाळ्याची टिक-टिक सतत सुरू राहणं गरजेचं असतं.

loading image
go to top