Vastu Tips For New Home : फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी हे वास्तुदोष अवश्य तपासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Home

Vastu Tips For New Home : फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी हे वास्तुदोष अवश्य तपासा

Vastu Tips For New Home : वास्तूचा आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होत असतो. घर घेणे हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत करत असतो. आज आम्ही तुम्हाला फ्लॅटच्या वास्तूविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी आपण वास्तूच्या या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे.

हेही वाचा: Vastu Tips: झाडूसह या गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर अन्नपूर्णा देवीचा होऊ शकतो कोप..

  • फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी सोसायटीचे मुख्य गेट बघावे. हा भूखंड दक्षिण-पश्चिम बाजूला नसावा. यासह, गेटसमोर कोणतीही उंच इमारत असू नये.

  • सोसायटीचा जलतरण तलाव प्लॉटच्या उत्तर दिशेला असावा. त्याच वेळी, टेनिस लॉन, क्लब आणि इतर बैठक क्षेत्र प्लॉटच्या उत्तर-पश्चिम भागात असले पाहिजेत.

  • फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पायऱ्या नाहीत याची खात्री करा. या पायऱ्या तुमच्या घरात गुडलक येण्यापासून रोखतात. घरासमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा. जर तुमच्या घरासमोर अशी परिस्थिती असेल तर, तुम्ही घराच्या दिशेने प्रकाश पसरवणारा मोठा दिवा लावावा. असे केल्याने वास्तूचे दोष दूर होतात.

  • घरासमोर कोणताही पिलर नसावा.तसेच फ्लॅटच्या भिंतीची बाहेरील कडा तीक्ष्ण नसाव्या.

हेही वाचा: Vastu Tips : पैशाच्या तुटवड्याने हैराण आहात? हे तीन सोप्पे उपाय करा

  • सदनिका खरेदी करण्यापूर्वी सोसायटीच्या प्लॉटचा आकारही तपासावा. ते चौरस किंवा आयताकृती असावे. यानंतर तुम्ही जो फ्लॅट घेण्याचा विचार करत आहात त्याचा आकार तपासा. काहीवेळा बांधकाम व्यावसायिक प्रत्येक खोलीला वेंटिलेशन देण्यासाठी फ्लॅटच्या आकारात बदल करतात. मात्र, असे करणे वास्तुदोषाच्या श्रेणीत येते.

  • तुम्ही जो फ्लॅट घेण्याचा विचार करत आहात, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण फ्लॅट मुख्य दरवाजातून दिसू नये याची खात्री करून घ्यावी. विशेषत: तुमची बेडरूम आणि टॉयलेट मुख्य दरवाजातून दिसत नाही ना हे तपासा.

  • काही सोसायट्यांमध्ये बेसमेंटमध्ये देण्याऐवजी तळमजल्यावर दिले जाते. मात्र, असे केल्याने पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात वास्तुदोष येतो. यामुळे घराचा पाया पोकळ होतो. त्यामुळे बेसमेंटमध्ये पार्किग आहे का ते अवश्य तपासा.

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Buy Homevastu tips