

Vastu Tips: Grow 3 Plants in Glass Bottles Without Soil
esakal
Vastu shastra: घर सुंदर, प्रसन्न आणि टवटवीत दिसावे यासाठी अनेक जण विविध प्रकारची इनडोअर रोपे लावतात पण, प्रत्येकाकडे झाडे लावण्यासाठी मोठे अंगण किंवा बाग असेलच असे नाही. अशा वेळी जागेची अडचण नसतानाही अगदी सोप्या पद्धतीने मातीशिवाय फक्त पाण्यात रोपे वाढवणे हा एक उत्तम पर्याय ठरतो. यासाठी मोठ्या कुंड्यांची गरज नसून एक सुंदर काचेची बाटली किंवा बरणी आणि थोडेसे पाणी पुरेसे असते.
वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार, घरात लावलेली काही विशिष्ट रोपे फक्त घराची शोभा वाढवत नाहीत, तर सुख-समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतात. कोणत्या दिशांना कोणती रोपे ठेवावीत आणि त्यांची निगा कशी राखली जावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-