Vastu Tips : तुम्हाला सारखी नजर लागते का? हे उपाय ठरतील फायद्याचे

जरा आवरून तयार झालं की, दृष्ट लागते. आजारपण येतं किंवा खूप जांभया सुरू होतात. मग मोठे लोक नजर लागली म्हणतात. यावर उपाय काय जाणून घ्या.
Vastu Tips
Vastu Tipsesakal

How to Protect Yourself from Negative Energy : न्यू इयर म्हटलं की, पार्टी आलीच. मग त्यासाठी छान तयारी केली जाणार, एकतर आपल्या घरी तरी पाहुणे येणार किंवा आपण बाहेर कुठे जाणार. पण जरा आवरून तयार झालं की, दृष्ट लागते. आजारपण येतं किंवा खूप जांभया सुरू होतात. मग मोठे लोक नजर लागली म्हणतात. असं तुमच्या बाबतीतही घडतं का?

सोशल मीडिया इंफ्लूएंसर, ज्योतिष, मोटीव्हेशनल स्पीकर, वास्तू तज्ज्ञ डॉ. जाई मदान याविषयी मार्गदर्शन करतात. त्यांनी सांगितलेले काही सोपे उपाय तुम्हालाही फायद्याचे ठरू शकतात.

Vastu Tips
Vastu Tips : लक्ष्मीची कृपा हवी असेल तर या दिशेला अगरबत्ती लावा

जर घरी पाहुणे येणार असतील तर डेकोरेशन करताना पहिले या काही सोप्या टिप्स वापरल्या तर त्याचा फायदा होईल.

यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले गोल आकारातला दुधाळ पारदर्शक क्रिस्टल आणि जाड मिठ घ्यायला सांगितलं आहे.

Vastu Tips
Vastu Tips: ज्योतिषशास्त्रानुसार घरात वटवाघुळानं प्रवेश करणं का अशुभ मानलं जातं..

क्रिस्टल का?

क्रिस्टल लाइट सोशून घेतं आणि परावर्तीतही करतं. त्यामुळे यात नकारात्मकता शोसली जाऊन सकारात्मकता परावर्तीत होते असं म्हटलं जातं.

Vastu Tips
Shankh Vastu Tips : देवघरात नक्की कुठे असावा शंख? काय म्हणतात ज्योतिषी

काय करावं?

  • जेव्हा घरी पाहुणे येणार असतील तेव्हा हे क्रिस्टल्स एका ताटलीत घेऊन मुख्य प्रवेशद्वारजवळ एखाद्या झाडामागे किंवा एखाद्या वस्तू मागे लपवून ठेवावे.

  • किंवा एका भांड्यात भरपूर जाड मीठ घेऊन त्यात ठेवावे.

  • जर एखाद्या गोष्टीची शक्ती वाढवायची असेल तर हे रोपात ठेवणं फायदेशीर ठरतं. पण जर नकारात्मकता घालवायची असेल तर जाड मीठ उपयुक्त ठरतं.

  • पार्टी संपल्यावर ते मीठ पाण्यात घालून फेकून द्या. क्रिस्टल धूवून ठेवून द्या.

  • किंवा जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर लहानसा क्रिस्टल सोबत बाळगा. शरीराला त्याचा स्पर्श होईल अशा पध्दतीने असावा.

  • घरी आल्यावर पाण्यात जाड मीठ घालून आंघोळ करा. म्हणजे तुम्हाला दृष्ट किंवा नजर लागणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com