Vastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips

Vastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..

घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम उपयुक्त आहेत. कोणत्याही वास्तूचे नियम हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांवर आधारित असतात. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तूमध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाद होतात आणि अशुभता ठाण मांडून बसते. यांच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन संकटांनी घेरले जाते आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज आपण यासंबंधित वास्तूचे हे नियम जाणून घेऊया.

हेही वाचा: Vastu Tips : स्वयंपाकघरातील तवा ठेवताना 'ही' चूक कधीही करु नका; नाहीतर...

  • शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. असे म्हणतात की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख-शांती निघून जाते. उलटे ठेवलेले चप्पल हे सूचित करते की तुमचा पैसा येण्याचा मार्ग अवरोधित होऊ शकतो.

  • घाईघाईत कुठेही बूट आणि चप्पल काढणे टाळावे. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. घरातील सदस्यांनाही आर्थिक अडचणीतून जावे लागेल.

  • वास्तूनुसार शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत. चप्पल आणि शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा संपते. ही दिशा माता लक्ष्मीची आहे आणि या दिशेला जोडे ठेवल्याने माता लक्ष्मीचा वास घरात राहत नाही.

  • वास्तूनुसार घरातील कपाटमत बूट आणि चप्पले काढून ठेवावी. हा वॉर्डरोबमुळे नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते.

  • बाहेरून येतानाही बूट आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावीत. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते.

हेही वाचा: मनगटावरचे घड्याळही नशीब बदलेल; हातात घालण्याचीही आहे पद्धत, पहा कशी?

टॅग्स :Warehousevastu tips