Vastu Tips : घरून काम करताय, लॅपटॉप या दिशेला ठेवून काम करा, होईल फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vastu tips

Vastu Tips : घरुन काम करताय, लॅपटॉप या दिशेला ठेवून काम करा, होईल फायदा

कोरोनानंतर काम करण्याच्या पद्धतीला एक नवीन गती प्राप्त झाली आहे, ती म्हणजे 'वर्क फ्रॉम होम'. काम करणे जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. घरातून काम केल्याने वेळ तर वाचतोच, पण त्यामुळे दिनचर्या ही सोपी होते. परंतु काही लोकांना घरातून काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत नाही,पदोन्नती रखडली आहे.याचे ज्योतिषीय कारण असे आहे की लोक घरातून काम करताना वास्तु नियमांचे पालन करत नाहीत.

बेडरूम, बाल्कनी, डायनिंग टेबल, किचन कोणत्याही ठिकाणी लोक लॅपटॉप उघडून काम करू लागतात. काम करण्याची ही पद्धत वास्तूमध्ये चुकीची असल्याचे म्हटले आहे. यामुळे तुमची कार्यक्षमता आणि उत्पादकता दोन्ही कमी होते. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह जी यांनी घरातून काम करताना काम कसे करावे आणि लॅपटॉप ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे याबद्दल सांगितले आहे.

लॅपटॉप या दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रात दिशेला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा परफॉर्मन्स सुधारायचा असेल, तर लॅपटॉपला योग्य दिशेने ठेवणे खूप गरजेचे आहे. वास्तूनुसार लॅपटॉप उत्तर दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते.

घरातून काम करताना या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कामासाठी घराचा पश्चिम किंवा नैऋत्य कोपरा सर्वात शुभ आहे.तुम्ही जिथे काम करता ते ठिकाण रोज स्वच्छ करा. तसेच, फुलांनी किंवा कोणत्याही शोपीसने सजवा.तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा हे लक्षात ठेवा. जर त्या ठिकाणी अंधार असेल तर तिथे नकारात्मकता राहते, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो.

तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मकता निर्माण करणाऱ्या गोष्टी असाव्यात. यासाठी तुम्ही उगवत्या सूर्याचे पेंटिंग लावा. फुलांची रोपे लावु शकता .घरातून काम करतानाही तुमच्या कामात एकाग्रता आणि समन्वय राखला पाहिजे. यासाठी तुम्ही घराच्या ज्या भागात काम करत आहात ते कामाच्या ठिकाणाप्रमाणेच व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न करा.