
Vat Purnima 2025: हिंदू धर्मात वट पौर्णिमेला खुप महत्व आहे. हा सण प्रत्येक महिलेसाठी खास असतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा वट पौर्णिमा कधी आणि शुभ मुहूर्त काय हे सविस्तरपणे जाणून घेऊया.