
Vat Purnima Puja Samagri: यंदा वट पौर्णिमा १० जून रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. हा सण विवाहित महिलांसाठी खुप खास असतो. प्रत्येक विवाहित महिला या दिवसाची वाट पाहत असते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. पण जर पती-पत्नींनी या दिवशी एकत्र काही खास उपाय केले तर वैवाहिक जीवनात प्रेम आणि जवळीकता अधिक वाढते.