Vat Purnima 2025: वट पौर्णिमेनिमित्त वाचा वडाच्या झाडाचे औषधी फायदे अन् वात विकारांवरील नैसर्गिक उपाय!

Medicinal Uses of Banyan Tree for Vata Disorders: औषधी गुणांनी भरपूर वडाचे झाड आहे वात विकारासाठी गुणकारी; पाने, साल सर्वकाही देखील उपयुक्त.
Banyan Tree Health Benefits | Vat Purnima 2025
Banyan Tree Health Benefits | Vat Purnima 2025Sakal
Updated on

Ayurvedic Remedies Using Sacred Banyan Tree Parts: पित्तनाशक, वातनाशक वड हा वृक्ष, आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायक असलेला हा वृक्ष होय. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, अर्थात वटपौर्णिमेपुरतीच वडाची पूजा करणे एवढेच त्याचे महत्त्व नाही. एक आराध्य वृक्ष म्हणूनही त्याची गणना होते.

हजारो वर्षांपासून आयुर्वेदात विशेष स्थान मिळविलेल्या या वृक्षाचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. वडाच्या पारंब्या असोत की, पाने, साल; या प्रत्येकामध्ये औषधी गुणधर्म आहेत. या अवाढव्य वृक्षाला फांद्याही अनेक असतात. त्यामुळे तो उन्हाळ्यात भरपूर सावली देतो.

वेदांमध्ये या वृक्षाचा उल्लेख "न्यग्रोध' असा आला आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी संस्कृत ग्रंथांतून वडाचा संदर्भ देण्यात आला आहे. वडाला "आराध्य वृक्ष' असेही म्हणतात. म्हणून तर सुवासिनी वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात.

प्राचीन काळापासून परदेशी नागरिकांचे आकर्षण ठरलेला हा वृक्ष आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील जावळी, नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यात वडाचे प्राचीन वृक्ष आहेत.

वडाच्या फांद्या तोडून त्यांच्या लहान लहान काठ्यांचा उपयोग यज्ञात समिधा म्हणूनही होतो. हिंदू आणि बौद्ध धर्मीय नागरिक या वृक्षाला पवित्र मानतात.

वडाचे पान चवीस तुरट, कोरडे असते. जखम झाल्यास त्यावर वडाच्या सालीचा काढा उपयुक्त ठरतो. याबाबत वैद्य अविनाश खडीवाले म्हणाले, ""कालपरत्वे वडाची झाडे कमी झाली आहेत; पण वडाला नक्षत्र आणि राशींचा वृक्ष असे म्हटले जाते. तसेच तो आयुर्वेदीयदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्या पारंब्यांच्या काढ्यापासून तयार झालेल्या तेलामुळे केस वाढीस आणि गळणे थांबण्यास उपयोग होतो. वडाच्या पानांमध्ये संधिवात, आमवात असे वाताचे विकार कमी करण्याची गुणवत्ता आहे. वडाच्या पानांच्या काढ्यामध्ये सुंठ घालून प्यायल्यास शरीरातील वातप्रकोप जातो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com