Vinayak Chaturthi 2022: कधी आहे मार्गशीर्ष विनायक चतुर्थी? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित केली जाते.
Vinayak Chaturthi 2022
Vinayak Chaturthi 2022Esakal
Updated on

Vinayaka Chaturthi November 2022: हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूजेचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेने केली की ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यात दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते.दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.तर  आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात .

मार्गशीर्ष विनायक चतुर्थी तिथी आणि पूजा मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी सुरु होते आणि 27 नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी संपते. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी 27 नोव्हेंबरला साजरी केला जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी 11 वाजून 06 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 12 मिनिटापर्यंत शुभ वेळ असेल.

मार्गशीर्ष विनायक चतुर्थीचे धार्मिक महत्व काय आहे ?

हिंदू धर्मात सर्वात पहिली पूजा भगवान गणेशाची केली जाते. कुठल्याही शुभ कार्य करण्यापूर्वी पहिले गणेशजीची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात

Vinayak Chaturthi 2022
Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

मार्गशीर्ष विनायक चतुर्थी पूजन विधी कसा करावा?

विनायक चतुर्थीच्या शुभ दिवशी सकाळी स्नान करून लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. कारण हा रंग गणपतीला आवडतो. आता पूजेच्या ठिकाणी पिवळे किंवा लाल कापड लावून गणेशाची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर त्यांना जलाभिषेक करून त्यांना सिंदूर लावून तिलक लावावा. आता त्यांना दुर्वा, फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावून आरती करा.

Vinayak Chaturthi 2022
Winter Recipe: वर्षेभर टिकणारा आवळ्याचा मोरावळा कसा तयार करायचा?

विनायक चतुर्थीला या मंत्रांचा जप करा –

“ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”

“गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा   भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”

“वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

मार्गशीर्ष विनायक चतुर्थीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. 27 नोव्हेंबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. 27 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 53 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 38 मिनिटापर्यंत रवि योग आहे. त्यानंतर याच दिवशी दुपारी 12 वाजून 38 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 54 मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. या दोन्ही योग शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com