
सिद्धेश्वर मारटकर
१९ जुलै ते २५ जुलै या आठवड्यात कर्क राशीत अमावस्या होत आहे. मेष लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थात होणारी अमावस्या उत्तर भारतान मोठी नैसर्गिक दुर्घटना घडविणारी राहू शकते. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या प्रदेशात पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटनेतून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. तर चतुर्थातील अमावस्या मोठ्या भूकंपासाठी प्रतिकूल राहील.