Sade Sati Effect On Marriage : साडेसातीचा लग्नावर काय परिणाम होतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sade Sati

Sade Sati Effect On Marriage : साडेसातीचा लग्नावर काय परिणाम होतो?

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Sade Sati Effect On Marriage : शनिची साडेसाती मागे लागली की, अगदी हाता सरशी होणारी कामंदेखील पूर्णत्वास नेण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये अगदी सामान्य गोष्टींचाही समावेश असतो. साडेसातीचा आपल्या सर्वच गोष्टींवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो.

Astrology

Astrology

हेही वाचा: Sade Sati : साडेसाती म्हणजे काय?

मात्र, साडेसातीचा लग्नावर परिणाम होतो का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. आज आपण साडेसातीचा लग्नावर परिणाम होतो का? याबाबत जाणून घेणार आहोत.

जेव्हा जातकाला साडेसाती लागते आणि शनी महाराज माथ्यावर म्हणजे चंद्र राशी बरोबर येतात तेव्हा त्यांची सातवी दृष्टी ही जोडीदारावर आलेली असते आणि याच कालावधीत आपल्याबरोबर आपला जोडीदारही या साडेसातीमध्ये भोग भोगत असतो. आपल्याबरोबर त्याचीही शनि महाराज परीक्षा घेत असतात. यात आपला जोडीदार आफल्याशी किती एकनिष्ठ आहे किंवा किती साथ देऊ शकतो हे कळते. काही जातकांचे यासाठी घटस्फोटही होत असतात तर, काहींचें जोडीदार शेवटपर्यंत निभावून नेतात.

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

Shani Jayanti

Shani Jayanti

उदाहरणच द्यायचे झाले तर, आपल्याला राजा विक्रमादित्य यांची गोष्ट माहितीच असेल. जशी त्यांची साडेसाती सुरू झाली तसं त्यांना आपलं राज्य सोडावा लागलं. यावेळी त्यांच्या पत्नीने याकाळात शनि महाराजांची भरपूर भक्ती केली. शनी महात्म्य वाचले जप केले. गोरगरिबांना दानधर्म केले. अडचणीत असणाऱ्यांची मदत केली. म्हणून राजा विक्रमादित्तांना त्यांचे राज्य परत मिळाले.

कोणत्या टप्प्यात साडेसाती चांगली असते ?

साडेसाती ही माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मावर आणि आत्ता केलेल्या कर्मांवर अवलंबून असते. काहींना तर साडेसाती आली काय आणि गेली काय हेही जाणवत नाही तर, काहींची या साडेसातीत प्रचंड कसोटी लागते. जर आपली कर्म नीट असतील तर, शेवटच्या टप्प्यामध्ये जाता जाता शनि महाराज जेवढे गेले आहे त्याहीपेक्षा जास्त देऊन जातात किंवा एखाद्याला कायमचे जमीन दोस्तही करतात.

हेही वाचा: Ravan Shani Dev Katha : रावणामुळे शनिदेवाची साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते; जाणून घ्या कथा

शेवटी साडेसाती ही माणसाच्या कर्मावर अवलंबून असते. त्यामुळे चांगलं वागणं आणि चांगलं कर्म करणं हेच माणसाच्या हातात आहे. कारण शनि महाराज हे दासत्वाचे कारक आहे जर, तुम्ही नम्र राहिलात, तर आपल्याला याची चांगली फळे मिळतात कारण शनि महाराजांना अहंकार हा अप्रिय आहे. कारण गर्वाचे घर नेहमी खालीच असते.

शनिच्या साडेसातीमध्ये जर || ॐ शं शनैश्चराय नमः|| हा जप करणे खूप फायदेशीर ठरते. याशिवाय शनी महात्म्य वाचावे गोरगरिबांना मदत करावी. अडचणीत असलेल्यांची मदत करावी. यातून साडेसातीत कमी त्रास होतो.

वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

टॅग्स :marriageShani Jayanti