दिवाळीतील परीट समाजाची ‘दिवा परंपरा’ काय आहे? जाणून घ्या

कोकणात एकेकाळी ‘परटाचा दिवा’प्रसिद्ध होता.
दिवाळीतील परीट समाजाची ‘दिवा परंपरा’ काय आहे? जाणून घ्या
Updated on

दिवाळीत परीट समाजाचंही महत्त्व अनन्यसाधारण असतं. कोकणात एकेकाळी ‘परटाचा दिवा’प्रसिद्ध होता. बांबूच्या खोबणीत लामण दिवा लावून परीट स्त्री घरोघरी जायची आणि प्रत्येक घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायची.तेव्हा परिटणीकडून ओवाळून घेणं ही सन्मानाची गोष्ट समजली जायची. त्यासाठी दिवाळीपूर्वीच परीट चौकात जाऊन त्यांना आमंत्रण दिलं जायचं.

दिवाळीतील परीट समाजाची ‘दिवा परंपरा’ काय आहे? जाणून घ्या
Diwali Festival 2021 : वसुबारस, धनत्रयोदशीने दीपावलीस सुरूवात

ओवाळणी झाली की, परीट स्त्रीला फराळ आणि दक्षिणा दिली जायची. 'परीट' हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. (परीटालाच विदर्भात धोबी असे म्हणतात.) घरोघरीचे कपडे गोळा करून ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे त्यांचं मुख्य काम होतं. त्यांना गावकऱ्यांचे धुणे धुण्याचे काम लग्नकार्य आणि सोयर-सुतकप्रसंगी विशेषत्वाने करावे लागे.

गावातील लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चादर धरणे, हळदीला शाल धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा या समाजाकडे होती. देशभरात दहाएक कोटी लोकसंख्येचा, हा विखुरलेला समाज ग्रामीण भागात आपल्या प्रथा परंपरा, काही ठिकाणी इस्त्रीचा परंपरागत व्यवसायही सांभाळून आहे. संत गाडगेबाबा याच समाजात जन्मले. त्यामुळे या समाजाचं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे.

दिवाळीतील परीट समाजाची ‘दिवा परंपरा’ काय आहे? जाणून घ्या
आगरी समाजात दिवाळीच्या काळात घरात खेकडा जाळला जातो, कारण..

पूर्वी नदीच्या काठाला बांधलेल्या घाटांवर परीट लोकं धुणं धुवायची. त्या बदल्यात सुरुवातीला त्यांना पोटाला खाणं मिळायचं. नंतरनंतर धान्य मिळू लागलं आणि कालौघात पैसा मिळायला सुरुवात झाली. काळाच्या ओघात परिटणीचा दिवाची परंपरा अगदी मिनमिनत्या दिव्यासारखी झाली आहे. फारच कमी गावात परिटाचा दिवा घेऊन जाण्याची परंपरा शिल्लक आहे.

मागच्या दिवाळीला आमच्याकडे ज्या काकु परीटाचा दिवा घेऊन ओवाळायला आल्या होत्या. त्याच्या हातात ताम्हणात साधा दिवा होता. बांबुचा लामण दिवाही आता हळूहळू लोप पावत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com