
What To Buy And What Not To Buy On The Occasion Of Gudi Padwa: गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. अनेक महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, गुजराती, उत्तर भारतीय लोक हा सण वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करतात. जगभरातील सगळे महाराष्ट्रीयन लोक या दिवशी आपल्या घराच्या दारात, खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात करतात.
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेकजण गुढीपाडव्याला नवीन कपडे, धातू, गाड्या, घर अशा अनेक गोष्टींची खरेदी करतात. परंतु, या दिवशी काही विशिष्ट वस्तूंची खरेदी टाळावी असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात.