

When is Akshaya Tritiya 2026 | Date, Muhurat and Shubh Yog
sakal
Akshaya Tritiya Muhurat and Shubh Yog: दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात या सणाला एक अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. तसेच, सोने-चांदीची खरेदी आणि दान करण्याचे कार्य देखील अत्यंत शुभ मानले जाते. इतकंच नाही, तर या दिवशी केलेलं प्रत्येक चांगलं कार्य अखंड फळ देतं, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच हा दिवस फक्त सण नसून नव्या सुरुवातींसाठी सर्वोत्तम मानला जातो. मात्र यंदाच्या अक्षय तृतीयेच्या तारखेबद्दल सगळ्यांची गफलत होत आहे.