
When Will Start Chaitra Month 2025: हिंदू पंचांगानुसार, चैत्र हा हिंदू वर्षातील पहिला महिना असतो. दरवर्षी या महिन्याची सुरुवात चैत्र कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. या महिन्यात अनेक महत्त्वावचे सण आणि उत्सव साजरे केले जातात, जसे की चैत्र नवरात्र, रामनवमी, पापमोचनी एकादशी, इत्यादी. तसेच या महिन्यात देवीच्या 9 रूपांची पूजा-अर्चना करणे, उपासना करणे शुभ मानले जाते. हा कालावधी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य असतो. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी चैत्र महिना कधी सुरु होणार आहे.