

When is Ram Navami 2026? Find Accurate Date, Auspicious Timing & Rituals
sakal
Ram Navami 2026 Date: प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल नवमीला राम नवमी साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. रामभक्त मोठ्या भक्तिभावाने प्रभू श्रीरामाची पूजा अर्चना करतात. एवढंच नाही, तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनेही गायली जातात.
मात्र यंदा 2026 मध्ये या दिवशी काहींच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, की राम नवमी 26 की 27 मार्चला साजरी करायची? पंचांगानुसार तिथी आणि शुभ मुहूर्त कसे ठरवतात, पूजा विधी कधी आणि कशी करावी, हे सर्व जाणून घेणे महत्वाचे आहे. या लेखात आपण यंदाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि राम नवमीची पूजा कशी करावी ते सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत.