
Importance of Shani Amavasya for Pitru Puja: हिंदू परंपरेत जसे पौर्णिमेला महत्त्व आहे तसंच अमावास्येला देखील अत्यंत पवित्र मानलं जातं. अमावास्येला बहुतंशी वेळी पितरांची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि आशीर्वाद मिळावे म्हणून दानधर्म, उपवास करण्याची प्रथा आहे. यादिवशी केलेले काम पितृदोष मुक्तीसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
यंदा ही अमावस्या शनिवारी येत असल्याने या अमावास्येला शनी अमावस्या म्हटले आहे. शनिवार हा शनिदेवाचा दिवस असल्याने यादिवशी फक्त पितरांचे आशीर्वादच नाही तर शनिदेवाची कृपादेखील लाभणार आहे.