
Holika Dahan 2025 Time: हुताशनी पौर्णिमा किंवा होळी गुरुवारी (ता. १३) आहे. सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनंतर फाल्गुन शुक्ल पौर्णिमा प्रारंभ होत आहे. यंदाचा पुण्यपर्वकाळ सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनंतर आरंभ होत आहे. होलिका पूजन व प्रज्वलन करण्याचे देखील शास्त्रामध्ये काही मुहूर्त सांगितलेले आहेत. सायंकाळी ६.४५ ते रात्री ८ वाजेपर्यंत होलिका पूजन, प्रज्वलनाचा पुण्यपर्वकाळ सांगण्यात आला असल्याचे गुरुजींनी सांगितले.