Ramayana Story: प्रभू श्रीरामांच्या बहिणीच लग्न एका ऋषींशी कसं झालं?

ऋषी शृंगी हे राजा दशरथाचे जावई होते हे फार कमी लोकांना माहीत असेल
Ramayana Story
Ramayana Storyesakal

Ramayana Story: तुम्ही लहानपणापासून रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी ऐकल्या असतील. राजा दशरथाला चार मुलं, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पण यापल्याड रामाला एक बहीण सुद्धा होती. हिंदू धर्मातील वेद, पुराण, ग्रंथ आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये हिंदू धर्माची संस्कृती आणि वारसा वर्णन केलेला आहे. या वेद पुराणांमध्ये जीवन जगण्याच्या पद्धतीसोबतच धर्म आणि अधार्मिकतेबाबतही शिकवण देण्यात आली आहे.

रामायण हा देखील एक धार्मिक ग्रंथ आहे हे आपणा सर्वांना माहित असेलच. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे चरित्र वर्णीले आहे. हा ग्रंथ धर्मावर अधर्माचा विजय आणि इतर अनेक कथांचे वर्णन करते. रामायणात अनेक पात्रांचे चित्रण आले आहे. तसेच रामायण काळातील शृंगी ऋषींबद्दलही सांगितले आहे.

कोण होते ऋषी श्रृंगी?

ऋषी श्रृंगी बद्दल फार लोकांना माहिती नाही. ऋषी शृंगी हे राजा दशरथाचे जावई होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. मुळात राजा दशरथाची एक मुलगीही होती हे देखील अनेकांना माहीती नसेल. चला तर मग जाणून घेऊया की शृंगी ऋषी कोण होते, ते राजा दशरथाचे जावई कसे झाले. तुम्हाला माहिती आहे का की प्रभू श्रीरामांच्या जन्मामागेही शृंगी ऋषींची खूप मोठी मदत होती. चला शृंगी ऋषींनी राजा दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी कशी मदत केली हे देखील जाणून घेऊया.

Ramayana Story
Astro Tips Of Betel Nut : सुपारीचे 4 सोपे उपाय अडचणींच्या फेऱ्यातून करतील सुटका

प्रभू श्रीरामांच्या बहिणीच लग्न एका ऋषींशी कसं झालं?

श्रृंगी ऋषी हे रामायण काळातील एक सुप्रसिद्ध अत्यंत कुशल पुरुष होते. शृंगी ऋषी हे विभांडक ऋषींचे पुत्र आणि साक्षात कश्यप ऋषींचे नातू होते. धार्मिक मान्यतेनुसार राजा दशरथ आणि कौशल्या यांना एक मुलगी होती. जिचे नाव होते शांता. त्या लेकीला राणी कौसल्येची बहीण वर्षिणी आणि त्यांचे पती अंगराज्याचे राजा रोमपाद यांनी दत्तक घेतले होते. नंतर शांताचा विवाह शृंगी ऋषीशी झाला. अशाप्रकारे ऋषी शृंगी हे राजा दशरथ यांचे जावई आणि भगवान श्रीराम यांचे मेहुणे झाले.

शृंगी ऋषींनी राजा दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी कशी मदत केली?

इकडे दशरथ राजाला शांता नंतर मूलबाळ नव्हते. त्यांना असा मुलगा हवा होता जो आपला वंश चालवेल. ज्यासाठी त्यांनी आपले मंत्री सुमंत यांच्या सांगण्यावरून श्रृंगी ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी बोलावले. शृंगी ऋषी हे महान संत होते. शृंगी ऋषींचे आगमन होताच राजा दशरथाने त्यांचा सत्कार केला आणि प्रथेनुसार त्यांची कन्या शांता हिची तब्येत विचारून तिचा सत्कार केला. त्यानंतर ऋषी शृंगी यांनी त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने यज्ञ केला.

Ramayana Story
Astro Tips : मनगटातला लाल धागा पवित्र; पण २ राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये!

या पुत्रकामेष्टी यज्ञातून सूर्य देवांच्या आशीर्वादाने रामरायांचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला. वायूच्या आशीर्वादाने भरताचा जन्म झाला. यमराजापासून लक्ष्मणाचा जन्म झाला आणि इंद्राच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म झाला. श्री रामजी हे चार भावांमध्ये सर्वात मोठे होते. पण तो त्याच्या बहिणीपेक्षा लहान होता. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी श्री राम जयंती किंवा राम नवमी या उत्सवाचे वर्णन संस्कृत महाकाव्य रामायण म्हणून केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com