

Why You Should Chant the Vishnu Sahasranama Everyday: हिंदू पंचांगातील साधारणपणे दर ३२ ते ३३ महिन्यांनी येणारा महिना म्हणजे अधिक मास येतो. खरं म्हणजे सूर्याच्या वर्षात ३६५ दिवस असतात, तर चंद्राच्या वर्षात सुमारे ३५४ दिवस असतात. या दोन्ही वर्षांमध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात एक एक्स्ट्रा महिना जोडला जातो, त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. या पवित्र महिन्यात प्रामुख्याने विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा वाचन केलं जातं. मात्र फक्त या महिन्यातच नाही, तर रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर बरेच फायदे आपल्याला मिळतात.